‘मी हिंदूविरोधी नाही तर मोदी, शहा, हेगडे विरोधी आहे. माझ्या मते हे लोक हिंदू नाहीत, असे प्रकाश राज यांनी म्हटले आहे.प्रकाश राज म्हणाले, जे हत्यांचे समर्थन करतात, ते हिंदू असू शकत नाहीत. हे लोक मला हिंदूविरोधी ठरवतात तर मी देखील हे सांगू शकतो की, हे लोक हिंदूच नाहीत. अनंतकुमार हेगडे यांच्या संविधान बदलण्याच्या वक्तव्यावर प्रकाश राज म्हणाले, ‘चार दिवसांपूर्वी मी सिरसीमध्ये होतो. मी तेथेच स्टेजवरूनच मंत्र्यांना प्रश्न केला की, आपल्या संविधानाच्या सुरुवातीला एक प्रस्तावना असते, या प्रस्तावनेचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? माझ्या या वक्तव्यानंतर भाजपचा एक गट तेथे पोहोचला आणि त्यांनी स्टेजला गोमुत्राने साफ केले. एवढेच नाही, या लोकांनी असाही प्रचार केला की, प्रकाश राज गोमांस खातात आणि गोमांस खाणा-यांचे समर्थन करतात. त्यामुळे आम्ही हा स्टेज स्वच्छ केला आहे. मात्र, मी स्टेजवर बोलताना गोमांसाबाबत बोललोच नव्हतो. त्यामुळे हे लोक काहीही जन्माला घालू शकता.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews